Ex-Dividend | एक्स-डिव्हिडंड तारखेनंतर शेअर खरेदी करावा का? त्याबद्दल सर्व जाणून घ्या येथे

डिव्हिडंड म्हणजे लाभांश होय. डिव्हिडंड हा इंग्रजी शब्द असून लाभांश हा त्याला पर्यायी मराठी प्रचलित शब्द आहे. कंपनी ने डिव्हिडंड देण्याचं जाहीर केलं की त्या सोबत एक्स-डिव्हिडंड तारीख (Ex-Dividend Date) आणि डिव्हिडंड रेकॉर्ड तारखा (Dividend Record Date) देखील जाहीर केल्या जातात. आपण सामान्य गुंतवणूकदार यामुळे गोंधळून जातो. यातील नेमका फरक आपल्याला समजत नाही. तो नेमका फरक आपण आजच्या लेखातून समजून घेऊ