५ महत्त्वाच्या गोष्टी :  UPI – यूपीआय फसवणुकीपासून बचावा करता

भारतात २०१५ नंतर इंटरनेट स्वस्त झाले, त्याचबरोबर स्मार्टफोन ही आले. २०१८ च्या नोटबंदीच्या घोषणेनंतर व कोविड महामारी आल्यानंतर आर्थिक व्यवहारात डिजिटल क्रांती आली. ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online payment) मोठ्याप्रमाणात वाढ झाली व कॅशलेस व्यवहार अधिक सोपा झाला. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असते. छोटीशी चुकही मोठी महागात पडू शकते. क्षणात तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. एकीकडे, UPI – यूपीआय ने आपले जीवन खूप सोपे केले आहे, तर दुसरीकडे, अनेक फसवणुकीच्या घटनांना देखील खूपशी लोक झपाट्याने बळी पडत आहे.

अर्थसंकल्पीय रॅलीमुळे निर्देशांकात वाढ, तरअदानी समूहाच्या शेअर्सची विक्रमी घसरण|शेअर बाजार  |Stock Market

भारतीय सरकारचं २०२३ वर्षासाठीच बजेट आणि अदानी स्टॉक्सच्या विक्रमी घसरणीने चालू आठवडा भरपूर गाजला व दिवसाकाठी भरपूर अस्थिर राहिला.  बाजाराची दिशा या दोन घटनांच्या आसपासच्या बातम्यांशी संबंधित होती. अदानी समूहाच्या समभागांमध्ये विक्रमी घसरण होऊनही, सेन्सेक्स ६०,८४१  (+२.५५%) आणि निफ्टी १७,८५४ (+ १.४२ %) वर बंद झाला.

डेट आणि लिक्विड फंड म्हणजे काय रे भाऊ ?

प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी, महागाईशी लढण्यासाठी किंवा भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपले पैसे गुंतवायचे असतात, परंतु बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांमधून निवड करणे कठीण आहे. डेट फंड हे म्युच्युअल फंडाच्या मोठ्या चित्राचा भाग आहेत आणि लिक्विड फंड हे डेट फंडाचा एक भाग आहेत. हा लेख तुमच्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी, जोखीम आणि इच्छित परतावा या आधारावर लिक्विड फंड विरुद्ध डेट फंड बद्दल माहिती देतो.

बजेट २०२३ : आयकर नियमातील ५ बदल

केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी आयकर स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा केली. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प.
सध्या, ज्यांचे उत्पन्न ₹ ५ लाखांपर्यंत आहे ते जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालींमध्ये कोणताही आयकर भरत नाहीत. नवीन कर प्रणालीमध्ये सवलत मर्यादा ₹७ लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ` ७ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.