या आठवड्यात निफ्टी ५० का घसरला? शेअर मार्केटमध्ये पडझड का झाली? | शेअर बाजार  |Stock Market

शेअर बाजार – अदानी समूहातील शेअर्सच्या तुफान विक्रीमुळे, निफ्टी 2% पेक्षा जास्त खाली घसरला. त्याचबरोबर या आठवड्यात इतरही घडामोडी घडल्या.
हिंडनबर्ग नावाच्या वित्तीय संस्थेने एक अहवाल सादर केला. त्या अहवालात असे म्हटले आहे की, “218 अब्ज डॉलर्सचा भारतीय अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणूक योजनेत गुंतला आहे” त्यामुळे अदानी शेअर्स मध्ये भरपूर विक्री झाली व त्यांना लोअर सर्किट लागले

५ आयकर बचत योजना, ज्या तुमचे रिटायरमेंटचे टेन्शन दूर करतील

आदर्श आयकर करदात्याने ३१ मार्चची (आर्थिक वर्षाचा शेवट दिवस) वाट पाहण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा कर-बचत गुंतवणुकीचा प्रवास सुरू करावा. तुमचे आयकर बचत नियोजन १ एप्रिलपासून सुरू झाले पाहिजे तरच त्याला आदर्शआयकर नियोजन म्हणता येईल. तुमचे वार्षिक वेतन किंवा उत्पन्न कर पात्र ठरले तर तुम्हाला त्यावर कर द्यावा लागतो. तुम्ही पगारदार असाल किंवा व्यावसाईक, तुम्हाला आयकर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

कंपन्यांच्या त्रैमासिक कमाईनंतर या आठवड्यात निफ्टी वाढला | शेअर बाजार  |Stock Market

या आठवड्यात शेअर बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. परंतु २० जानेवारी रोजी संपलेल्या सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर बाजार उच्च पातळीवर बंद होण्यात यश आले कारण तिसर्‍या तिमाहीतील चांगली कमाई, चिनी अर्थव्यवस्था पुन्हा उघडणे आणि फेडरल रिझर्व्हने पुढे जाणाऱ्या दरवाढीबाबत नव्याने चिंता निर्माण केली. सप्ताहाअखेरीस बीएसई सेन्सेक्स 60,621वर (0.59 टक्क्यांनी वाढून) आणि निफ्टी 18,027 (0.39 टक्क्यांनी वाढून) बंद झाला.

जाणून घेऊया भारतातील “म्युच्युअल फंडाचा” इतिहास

भारतात म्युच्युअल फंड गुंतवणूक क्षेत्राने नुकताच ३९.८८ लाख कोटींचा रुपयांचा टप्पा पार केला आहे.
भारतीय गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक ही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक आहे.
मागील वीस वर्षात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना १२ ते २५ टक्क्यापर्यंत भरभरून परतावा दिला आहे. गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग म्हणून गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडस् नी ही विश्वासही मिळवला आहे.

पीपीएफ (PPF) की एनपीएस (NPS) ? निवृत्तीनिधी साठी कोणती गुंतवणूक फायदेशीर

निवृत्ती ही संकल्पना आपल्या सर्वांना प्रिय आहे. निवृत्तीचा अर्थ काम न करणे असा नसून आपल्या आवडीचं काम आपल्याला आवडेल तेव्हा आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने करणे असाही असू शकतो आणि हे केवळ आर्थिक स्वातंत्र्यानेच शक्य आहे. तथापि, जर तुम्ही पुरेशी बचत केली नाही तर, महागाई आणि वाढते आयुर्मान. या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची सेवानिवृत्तीच्या अपेक्षांना तडा जाऊ शकतो आणि  तुमचे निवृत्तीचे दिवस तणावपूर्ण असू शकतात. या कारणामुळे, भारत सरकारने आपल्यासाठी सेवानिवृत्तीसाठी पीपीएफ (PPF) की एनपीएस (NPS) हे बचत पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर, पण दर वाढीच्या भीतीने निफ्टीची घसरण सुरूच |शेअर बाजार  |Stock Market

शुक्रवारी भारतीय सोन्याच्या दराने या आठवड्यात सर्वकालीन उच्चांक गाठला. या आठवड्यात देशांतर्गत सोन्याचा भाव ५६,२४५ रुपये, प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला. महागाई कमी झाल्यामुळे आणि देशांतर्गत मजबूत संकेतांमुळे २०२३ च्या पहिल्या आठवड्याच्या घसरणीनंतर, भारतीय शेअर बाजार ह्या आठवड्याच्या शेवटी किंचित वाढीने बंद झाला. कंपन्यांच्यातिमाही निकालाचे परिणाम पुढील आठवड्याची दिशा दिशा ठरवू शकतील. १३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात इक्विटी बेंचमार्क, सेन्सेक्स आणि निफ्टी अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढले.

दैनिक एसआयपी (SIP)

लहानपणी आजी आजोबा म्हणा किंवा इतर नातेवाईक, यांनी दिलेले पैसे एक तर थेट आई बाबांकडे दिले जायचे किंवा गल्ल्यात जायचे. गल्ला म्हटलं, की सहसा प्लास्टिक किंवा पत्र्याचा उभा डबा आठवतो, ज्याला फक्त नाणी आणि नोटा घडी करून आत टाकायला छेद असायच साध्यासुध्या भाषेत सांगायचं झालं, तर हे ‘पिगी बँकेचं’ भारतीय रूप होतं. ते जुने दिवस आठवा जेव्हा पिग्गी बँक मध्ये पैसे वाचवले जायचे आणि ठराविक कालावधीनंतर आपण नेहमी हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करायचो. ही खरोखरच एक मोठी सवय होती जी आता आपण विसरलो आहोत. पण जर तुम्ही ती सवय आता अधिक डिजिटलाइज्ड पद्धतीने दैनिक एसआयपी द्वारे चालू ठेवू शकता आणि त्यावर परतावा देखील मिळवू शकता! मनोरंजक वाटते,

दर वाढीच्या भीतीने निफ्टीची घसरण सुरूच |शेअर बाजार | Stock Market

या आठवड्याचा शेअर बाजार : भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात केली आणि वार्षिक उच्चांकावर – पहिले दोन दिवस बाजार वाढले. मात्र, उरलेल्या आठवडी बाजाराचा ताबा घसरणीने घेतला. NIFTY50 आठवड्यात एक टक्क्यांहून अधिक घसरला. गुंतवणूकदारांसाठी आठवडा कसा ठरला ते पाहू.

स्टॉक मार्केट मध्ये पैसे का गुंतवावेत ? फायदा की तोटा

मागील काही वर्षात लोकं  फिक्स डिपॉझिट, सोन, रिअल इस्टेट इत्यादींसारख्या पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमधून ( स्टॉक मार्केट ) शेअर बाजाराकडे वळत आहेत. कारण, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा महागाईवर मात करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. स्टॉक्स किंवा शेअर्स तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मौल्यवान भाग असू शकतात. वेगवेगळ्या  कंपन्यांच्या  शेअर्स मध्ये  गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमची बचत वाढवण्यात, महागाई आणि करांपासून तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यात आणि तुमच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यात मदत होऊ शकते.