या आठवड्यात निफ्टी ५० का घसरला? शेअर मार्केटमध्ये पडझड का झाली? | शेअर बाजार  |Stock Market

शेअर बाजार  | साप्ताहिक अपडेट – २३ ते २७ जानेवारी २०२३

SM Weekly Update 23-27 Jan

शेअर बाजार – अदानी समूहातील शेअर्सच्या तुफान विक्रीमुळे, निफ्टी 2% पेक्षा जास्त खाली घसरला. त्याचबरोबर या आठवड्यात इतरही घडामोडी घडल्या.
हिंडनबर्ग नावाच्या वित्तीय संस्थेने एक अहवाल सादर केला. त्या अहवालात असे म्हटले आहे की, “218 अब्ज डॉलर्सचा भारतीय अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक हेराफेरी आणि अकाउंटिंग फसवणूक योजनेत गुंतला आहे” त्यामुळे अदानी शेअर्स मध्ये भरपूर विक्री झाली व त्यांना लोअर सर्किट लागले

या आठवडाभरातील शेअर बाजार : निफ्टीची हालचाल

सोमवार – गेल्या आठवड्यात मागील दोन दिवस घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी आठवड्याची सुरुवात उच्च पातळीवर केली. या रॅलीचे नेतृत्व आयटी, ऑटो आणि वित्तीय क्षेत्रातील समभागांनी केले. आठवड्याच्या शेवटी जाहीर झालेल्या बँकांच्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांनी आनंद व्यक्त केला, परंतु मेटल आणि रियल्टी निर्देशांकात घसरण दिसून आली.
मंगळवार – बेंचमार्क निर्देशांक उंचावले परंतु नफा टिकवून ठेवण्यात अयशस्वी झाले.. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले व निर्दशांक सपाट बंद झाले.
बुधवार – टाटा मोटर्स आणि मारुती समभागांमध्ये तेजीमुळे ऑटो निर्देशांक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निर्देशांकांपैकी एक होते. फार्मा आणि पीएसयू बँकांमध्ये दिवसभरात मोठी घसरण झाली. आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रातील तोट्यामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला. मिडकॅप निर्देशांक 1.5% पेक्षा जास्त खाली आला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.8% खाली आला. NIFTY चे बहुतांश समभाग दिवसभरात घसरले. अदानी शेअर्स दिवसभर फोकसमध्ये होते.
गुरुवार– प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होता.
शुक्रवार– भारतीय शेअर मार्केट तुफान विक्रीमुळे गडगडले. अदानी समूहाचे सर्व समभाग लोअर सर्किटला धडकले. अडाणी समूहाच्या कथेत गडबडीमुळे इतरही क्षेत्र जसे की बँक, तेल आणि वायू, उर्जा आणि धातू निर्देशांक 4-6% घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.2% आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.9% घसरला. भारतीय रुपया 81.59 प्रति डॉलरच्या तुलनेत किरकोळ वाढून 81.52 वर बंद झाला.

या आठवड्यातील निफ्टीतील ५ फायद्यात आणि तोट्यात असलेले शेअर्स

Image and data from indmoney.com

या आठवडाभरातील शेअर बाजार : क्षेत्रीय फायदा आणि तोटा

Image and data from indmoney.com

शेअर मार्केट बद्दल आणखी माहिती साठी इथे वाचा

आठवड्यातील प्रमुख ठळक मुद्दे :

निफ्टी 50 त्रैमासिक निकाल: अ‍ॅक्सिस बँकेने त्रैमासिक निकाल जाहीर केला. बँकेचा नफा वर्षभरात ६२% वाढून रु. ५८५३ कोटी झाला आणि तो अपेक्षेपेक्षा जास्त होता. मारुती सुझुकीची डिसेंबर तिमाहीत नफा दुप्पट झाला आणि तोही अपेक्षेपेक्षा जास्त होता. या आठवड्यात दोन प्रमुख वाहन निर्मात्यांनी देखील आपले तिमाही परिणाम सादर केले. बजाज  मोटर्स चा नफा 23% वाढला, तर महसूल 3% वाढला. 

अदानी स्टॉक्सवरील अपडेटः हिंडनबर्गच्या अहवालात कंपनीच्या व्यवसायावर आरोप झाल्यानंतर शुक्रवारी बहुतांश अदानी समभागांमध्ये लोअर सर्किट लागले. हिंडनबर्ग ही एक सुप्रसिद्ध यूएस वित्तीय गुंतवणूकदार संशोधन संस्था आहे.  तिने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की अदानी समूह ” स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत गुंतलेला आहे”. तर अदानी समूहाने हा आरोप दुर्भावनापूर्ण, अप्रमाणित, एकतर्फी आहे असे वर्णन  वर्णन करून फेटाळून लावला आहे. 

अदानी समूहाने नंतर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, “हा अहवाल निवडक चुकीच्या माहितीवर आणि  व्यवस्थित तपास न करता,  निराधार आणि  आणि बदनामीचे आरोप  यांचे पूर्ण संयोजन आहे.

नवीन  T+1 सेटलमेंट: नवीन T+1 सेटलमेंट या आठवड्यात लागू  झाली. याचा अर्थ असा की आता व्यापार-संबंधित सेटलमेंट्स व्यवहार एका दिवसात (24 तास) पूर्ण केले जातील. या नवीन फॉरमॅटमध्ये तुम्ही शेअर विकल्यास तुम्हाला एका दिवसात पैसे मिळतील आणि खरेदीदाराला डिमॅट खात्यातही शेअर्स एका दिवसात मिळतील. SEBI च्या नवीन नियमा नुसार, T+1 सेटलमेंट सायकल केवळ कालमर्यादा कमी करत नाही तर त्या जोखमीला फार मोठ्या प्रमाणात कमी करतात.  त्याच बरोबर आवश्यक भांडवल कमी करते . 

झोमॅटोने शेअर्स घसरले: झोमॅटोचे शेअर्स या आठवड्यात जवळपास 10% घसरले आहेत. 

बुधवारी, एका टप्प्यावर ते 15% ने कमी झाले. या घसरणीचे कारण एक अहवाल होता ज्यामध्ये असे म्हटले आहे की झोमॅटोने 10 मिनिटांची डिलिव्हरी ऑफर बंद केली आहे, 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. सिक्युरिटी मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याचे सूचक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *