₹ १ कोटी-रिटायरमेंट कॉर्पससाठी कुठे गुंतवणूक करावी? | रिटायरमेंट प्लॅनिंग |Retirement Planning

Retirement-Planning-1

जरी निवृत्तीची रक्कम व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकते, परंतु जर तुम्ही हुशारीने रिटायरमेंट प्लॅनिंग केलं, तर तुम्ही एक सुंदर निधी जमा करू शकता. निवृत्ती ही अशी वेळ आहे जेव्हा आरामात जगण्यासाठी पुरेसा आर्थिक निधी आवश्यक असतो. तुमचा सेवानिवृत्ती निधी तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे याची खात्री करण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
जरी निवृत्तीची रक्कम व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकते, परंतु जर तुम्ही हुशारीने योजना आखली तर तुम्ही एक सुंदर निधी जमा करू शकता

विविध वयोगटांसाठी विविध गुंतवणूक पर्याय पाहूयात

तुम्ही जितक्या लवकर सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवायला सुरुवात कराल तितकच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण निधी तयार करणे सोपे जाईल. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर, म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमच्या वयाच्या विसाव्या वर्षांमध्ये असता, तेव्हा तुमची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते आणि आर्थिक जबाबदाऱ्या कमी असतात. त्यामुळे, तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता आणि गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवण्यासाठी लक्ष्य ठेवू शकता.

रु १ कोटी रुपयांच्या निधीचे उदाहरण विचारात घ्या. जर तुम्ही आता २५ वर्षांचे असाल, तर तुमच्या हातात कॉर्पस तयार करण्यासाठी ३५ वर्षे आहेत. जरी तुम्ही दरमहा रु. १,५५०/- इतकी कमी गुंतवणूक जरी केली आणि तुमच्या पोर्टफोलिओवर वार्षिक सरासरी १२% परतावा मिळवलात तरी ही, तुम्ही ३५ वर्षांच्या कार्यकाळात सुमारे १ कोटी रुपयांचा निधी तयार करू शकाल.
मिड-कॅप आणि लार्ज-कॅप फंडांमध्ये विविधता आणताना, रु ५००/- विभागून तुम्ही दोन इक्विटी म्युच्युअल फंडाच्या SIP (systematic Investment Plan) मध्ये रु. १००० गुंतवणूक सुरू करू शकता. आणि उर्वरित ५५०/- रुपये डेट फंडात गुंतवू शकता. जसजसे तुमचे वय वाढत जाईल, तसतसे तुमची जोखमेची पद्धत बदलण्यासाठी तुम्ही हळूहळू निधीची विभागणी इक्विटी मधून डेट म्युच्युअल फंडात बदलू शकता.

३० ते ४५ वर्षे वयोगटासाठी

सहसा, ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लोक त्यांच्या करिअरमध्ये स्थायिक होतात आणि त्यांच्या उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत तयार होत असतो. ज्यांचे कुटुंब आणि मुले आहेत त्यांना आर्थिक जबाबदारी जास्त असतात. समजा या वयोगटातील लोकांनी सेवानिवृत्तीसाठी (रिटायरमेंट प्लॅनिंग) या आधीच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली नसेल. तर अशा स्थितीत, निवृत्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे अंदाजे २५ वर्षे (गुंतवणूक वयाच्या ३५ व्या वर्षी सुरू होते असे गृहीत धरून) आहेत. जस्तीच्या आर्थिक जबाबदारीमुळे त्यांची जोखीम घेण्याची क्षमता हळूहळू कमी होईल. त्यामुळे, या वयोगटातील गृहीत धरून, लोक त्यांच्या जोखमीच्या क्षमतेच्या बरोबरीने सरासरी १०% वार्षिक परतावा मिळवतील, त्यांना १ कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी पुढील २५ वर्षे दरमहा ७५००/- रुपये गुंतवावे लागतील. ते लार्ज-कॅप आणि मिड-कॅप फंडांच्या गुंतवणुकीच्या ५०% इक्विटी SIP मध्ये आणि उर्वरित ५०% रक्कम गुंतवणूक डेट फंडांमध्ये करू शकतात. वयाच्या वाढीसह, त्यांच्या जोखमीच्या क्षमतेतील बदलाशी जुळण्यासाठी ते हळूहळू निधीचे वाटप इक्विटी मधून डेट फंडात बदलू शकतात.

४५ ते ५५ वर्षे वयोगटासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग

तुमचे वय जसजसे वाढते आणि तुम्ही निवृत्तीच्या जवळ येत असाल, तर तुमची जोखिम घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. तर, ४५ ते ५५ वर्षे वयाच्या जोखमीच्या, जबाबदारीच्या पातळीवर तुम्ही असताना गुंतवणुकी वरील परतावा मोठ्या प्रमाणात रोखला जातो किंवा कमी असतो. रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी हा वयोगट गृहीत धरल्यास, गुंतवणूकदाराला सुमारे ८% वार्षिक परतावा देऊ शकेल अशी जोखीम घेण्यास सोयीस्कर असेल. गुंतवणूकदाराचे वय ५० वर्षे असल्यास, सेवानिवृत्ती पर्यंतच्या उरलेल्या १० वर्षांत, त्यांना १ कोटी रुपयांचा कॉर्पस तयार करण्यासाठी ८% प्रति परतावा दराने दरमहा सुमारे ५४,०००/- रुपये गुंतवावे लागतील.
४५ ते ५५ वर्षे वयोगटातील गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओत योग्य बँक फिक्स्ड डिपॉझिट / आरडी मध्ये विविधता आणली पाहिजे, जी सुमारे ८% किंवा त्याहून अधिक परतावा मिळवण्यासाठी डेट म्युच्युअल फंडातील SIP सोबत जास्त व्याज देतात.

हे ही वाचा : म्युच्युअल फंड ही रिटायरमेंटसाठीची चांगली योजना आहे का?

तज्ञ असा सल्ला देतात की “निवृत्तीसाठी एक मोठा निधी तयार करण्यासाठी, सुज्ञपणे गुंतवणूक करणे आणि आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहण्यास सांगतात. तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. तसेच, लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमची गुंतवणूक साधने काळजीपूर्वक निवडली नाहीत, तर भविष्यात महागाई मुळे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो.तुमचे उत्पन्न आणि खर्च दोन्ही २० वर्षांत झपाट्याने वाढतील. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार त्यांच्या गुंतवणुकीत वैविध्य आणले पाहिजे, निवृत्ती हे त्यापैकी एक आहे.”
तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे आणि जोखीम घेण्याची क्षमता, परताव्याची आवश्यकता आणि चलनवाढ (इन्फ्लेशन ) यांच्याशी जुळण्यासाठी आवश्यक ते समायोजन करणे महत्त्वाचे आहे. तुमचे वय, तुमची जोखीम घेण्याची क्षमता, तुमच्या गुंतवणुकीचा आकार आणि परताव्याची अपेक्षा यावर अवलंबून. तुम्ही सोने, लहान बचत योजना, शेअर्स, इंडेक्स फंड इत्यादी साधनांमध्ये देखील गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही शोधू शकता.

तुम्ही योजना आखत असाल तर लवकरात लवकर त्यांचा शुभारंभ करणे ही तुमच्याच पुढील जीवनाची सर्वात चांगली बाजू ठरू शकते. मोठ्या निधीसह निवृत्त होण्यासाठी. तुमच्या गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *