Mediclaim-आरोग्य विमा | 5 प्रमुख कारणे आरोग्य विम्याचा (मेडिक्लेमचा) विचार करण्याची

health insurance policy

आरोग्य विमा (मेडिक्लेम / mediclaim ), जो तुम्हाला आर्थिक सहाय्य प्रदान करून, तुमचा आरोग्यसेवेचा खर्च पूर्ण करण्यात मदत करते. त्याच बरोबर तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाचा ताण कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या गुंतवणूक प्लॅनिंग मध्ये आरोग्य विमा समाविष्ट करणे आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसी मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटवर दबाव टाकण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता लोक हॉस्पिटलमध्ये दाखल होणारा खर्च टाळण्यासाठी आरोग्य विमा घेत आहेत. एवढेच नाही तर कोणता आरोग्य विमा घ्यावा किंवा घेऊ नये, याचाही ते विचार करत आहेत.
आरोग्य विमा, 1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर कपाती व्यतिरिक्त विविध फायदे आणि कव्हरेज योजना प्रदान करतो. या सणाच्या हंगामात किंवा आर्थिक वर्षात कालांतराने संपत्ती जमा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त, आरोग्य विमा खरेदी करणे महत्वाचे आहे.

विमा उद्योग तज्ञांच्या मते, खालील 5 कारणांचा विचार करणे आवश्यक आहे.
विमातज्ज्ञ सांगतात की “तुमच्या कुटुंबासाठी विश्वासार्ह विमा कंपनी कडून, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना मिळवणे हे तुमच्या प्रियजनांची काळजी व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे!
वैद्यकीय खर्चाचा सतत वाढत जाणारा खर्च. भविष्यातील अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीच्या गरजांसाठी व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक कव्हरेजची उपलब्धता ही काळाची गरज आहे.”
“गेल्या दोन वर्षांत (करोना महामारी अनुभवल्या मुळे) आरोग्य विमा असण्याची गरज अत्यंत आवश्यक आहे. हॉस्पिटलच्या वाढत्या खर्चामुळे, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, आर्थिक नियोजनाचा विचार करताना आरोग्य विमा योजनांचा बजेटमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.”

आरोग्य विमा किंवा वैद्यकीय विमा (Mediclaim) खरेदी करण्याची 5 प्रमुख कारणे :

सध्याच्या काळात जीवन अनिश्चित आहे.कधीही काहीही होऊ शकते. वैद्यकीय खर्चाच्या वाढत्या किमतींमुळे, वैयक्तिक अपघात कव्हरेज मिळवणे सहसा श्रेयस्कर सोपं असते. विमा कंपनी तुमचा आरोग्य सेवांचा खर्च कव्हर करेल व अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला मदत करेल. तुमच्याकडे योग्य कव्हरेजसह आरोग्य विमा असल्यास, तुम्हाला फक्त तुमच्या निरोगी आरोग्यावर आणि लवकर बरे होण्यावर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल

बजेट

खिशाबाहेरील आरोग्यसेवा बिलांसाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. कारण आरोग्यसेवा खर्च सतत वाढत आहेत. तुम्ही खर्च न केलेले पैसे, तुमच्या गरजेनुसार तुम्ही बचतींसाठी वापरू शकता. तुमची बचत खर्च न करता, वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी काळजी घ्यायची असेल तर तुम्ही आरोग्य विमा योजनेची निवड करावीच लागेल. अनपेक्षित वैद्यकीय खर्चासाठी तुम्ही इतके कष्ट करवून साठवलेले / बचत केलेले पैसे खर्च करण्याची गरज नाही. वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा पॉलिसी बनवली जाते. ही योजना आरोग्य आणीबाणीमध्ये या खर्चाची भरपाई करून तुमचे पैसे खर्च होण्यापासून वाचवते.

वृद्धापकाळ नियोजन

तुमचे सेवानिवृत्तीचे जीवन सुरक्षित करण्यासाठी तुम्ही उचललेले पहिले पाऊल म्हणजे , जेव्हा तुम्ही आरोग्य विमा योजना खरेदी करण्यासाठी पैसे बाजूला ठेवता. प्रत्येकजण निवृत्तीचा निश्चिंत आणि आनंदी काळ म्हणून विचार करतो. परंतु तुम्ही अनपेक्षितपणे आजारी पडल्यास आणि आरोग्य विमा नसल्यास तुम्हाला गंभीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. याव्यतिरिक्त, सेवानिवृत्त झाल्यानंतर, तुमच्याकडे उत्पन्नाचे कमी किंवा कोणतेही स्रोत किंवा मार्ग नसेल, तेव्हा अगदी किरकोळ उपचार किंवा हॉस्पिटलमध्ये राहणे फार महागात पडेल. म्हणूनच आरोग्य विमा पॉलिसी आवश्यक आहे.

तणावमुक्त हॉस्पिटलमध्ये दाखल होणारा खर्च

कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी निवडण्याचे काम कमी करतात.. तसेच,प्रत्येक सदस्यासाठी आरोग्य कव्हर मिळविण्यासाठी आपल्याला स्वतंत्र प्रीमियम देण्याची गरज नाही. रुग्णालयात दाखल झाल्यास विमाधारक सभासद वैयक्तिक आरोग्य योजनेप्रमाणेच नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार घेऊ शकतो. अशाप्रकारे, आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उपचाराशी तडजोड न करता वैद्यकीय सेवेसाठी पात्र ठरवू शकता.

आरोग्य विमा प्रीमियमवरील कराचे फायदे

भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत, आरोग्य विमा प्रीमियमला ​​करात सूट देण्यात आली आहे. जर कोणी त्यांच्या कुटुंबासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा प्रीमियम भरत असेल तर तो कर लाभास पात्र आहे.

आपल्या कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करणे सुलभ व तुलना ( कंपेयर) करण्यासाठी, त्याच बरोबर भारतातील काही मोठ्या आरोग्य विमा योजनांची यादी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बजेट बचत, गुंतवणूक, विमा, कर्जाच्या विविध पर्यांसाठी आमचे इतर लेख वाचा

अस्वीकरण: * “बचत मित्र” एखाद्या विमाधारकाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही विशिष्ट विमा उत्पादकास किंवा विमा उत्पादनास मान्यता किंवा , रेट करत नाही किंवा त्याची शिफारस करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *