SIP कॅल्क्युलेटर (Systematic Investment Calculator)

म्युच्युअल फंड SIP रिटर्न कॅल्क्युलेट करा – तुमच्या मासिक ठेवी, अपेक्षित परताव्याचा दर आणि गुंतवणुकीचा कालावधी यावर आधारित म्युच्युअल फंड SIP रिटर्न कॅल्क्युलेट करा. आपले ध्येय साध्य करा!

एसआयपी कॅल्क्युलेटर का वापरावे? म्युच्युअल फंडातील गुंतवणूक SIP च्या माध्यमातून पद्धतशीर पद्धतीने करता येते. एसआयपी ही एक प्रकारची गुंतवणूक योजना आहे जी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्रैमासिक, मासिक किंवा साप्ताहिक आधारावर विशिष्ट रक्कम गुंतवू देते. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविण्यासाठी एसआयपी गुंतवणूक हा एक उत्तम मार्ग मानला जातो. म्युच्युअल फंडात SIP च्या मार्गाने गुंतवणूक केल्याने बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी होतो आणि गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळण्यास मदत होते. एसआयपी कॅल्क्युलेटरचा वापर केल्याने तुम्हाला नियमित अंतराने एसआयपीद्वारे तुमचे कष्टाचे पैसे गुंतवून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळू शकतो. SIP कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमची मासिक गुंतवणुकीची रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी टाकावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून अपेक्षित असलेली रक्कम कळेल.


टाइम / टर्म / फिक्स्ड डिपॉझिट कॅल्क्युलेटर (मुदत ठेव) (Time / Term / Fixed Deposit Calculator)

फिक्स्ड डिपॉझिट रिटर्न कॅल्क्युलेट करा – तुमच्या टाइम / टर्म / फिक्स्ड डिपॉझिट ठेवी, अपेक्षित परताव्याचा दर आणि गुंतवणुकीचा कालावधी यावर आधारित टाइम / टर्म / फिक्स्ड डिपॉझिटचे रिटर्न कॅल्क्युलेट करा. आपले ध्येय साध्य करा!

मुदत ठेव रकमेचा कॅल्क्युलेटर मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक मिळणाऱ्या चक्रवाढ व्याजासह मॅच्युरिटी रकमेचा (परताव्याचा ) हिशेब (कॅल्क्युलेट) करतो.
हे कॅल्क्युलेटर विशिष्ट कालावधीसाठी गुंतवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मोजू शकतो. हे कॅल्क्युलेटर गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मॅच्युरिटी रक्कम किती होईल ते सांगतो , त्यात व्याज एकतर मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक दिले जाऊ शकते; त्यानुसार हिशेब करणे आवश्यक आहे. हे कॅल्क्युलेटर फक्त व्याज चक्रवाढ पद्धततीनेच मिळत असेल तरच वापरले जाऊ शकते

.