Mutual Funds | ₹ १५ कोटी | १५ X १५ X १५ म्युच्युअल फंडाचा नियम – दरमहा स्टेप-अप SIP मध्ये पैसे गुंतवा

गुंतवणुक वाढीसाठी वेळ देणे म्हणजे बागेत खत घालण्यासारखे आहे. गुंतवणूक दीर्घकालीन असावी. लवकर गुंतवणूक केल्यास, उत्तम परतावा मिळतो. म्युच्युअल फंडस् तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवतात व  शेअर बाजार हे मूळातच अस्थिर आणि अनिश्चित मानले जातात. दरवर्षी १५% इतका चांगला परतावा शेअर बाजारात नेहमीच साध्य होऊ शकत नाही. तथापि, दीर्घकालीन गुंतवुणकीमुळे ते शक्य आहे. नजीकच्या भविष्यात सुमारे १५% वार्षिक परतावा शक्य होऊ शकतो, परंतु लक्षात ठेवा, या प्रकरणात सातत्य आवश्यक आहे. त्याच बरोबर हा निव्वळ चक्रवाढाचा (कंपाऊंडिंगचा) परिणाम आहे. 

Fixed Deposits|शुभवार्ता !! ह्या बँका फिक्स्ड डिपॉझिट वर ८ % टक्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत

मुदत ठेवींवरील (Fixed Deposits- एफडी) व्याजदर आता 8 टक्यांच्या पुढे जाऊ लागले आहेत. जोखीममुक्त गुंतवणूकदारांसाठी, त्यांचे पैसे मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर 8 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. या बँकांबद्दल जाणून घेऊया.

डेट की इक्विटी फंड ? 2023 मध्ये गुंतवणुकीसाठी कोणता फंड चांगला आहे?

डेट की इक्विटी फंड ? – म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी जाणीव ठेवलीच पाहिजे. जसे की डेट फंडातली गुंतवणूक स्थिर परतावा देते आणि, त्यात पैसे गमावण्याचा धोका ही फार कमी असतो !! परंतु ते इक्विटी फंडा पेक्षा अपेक्षित नफा देखील कमी देतात. तर इक्विटी फंड अधिक फायद्यांच्या संभाव्यतेसह डेट फंडा पेक्षा अधिक धोकादायक देखील असतात. गुंतवणूकदरांनी निर्णय घेताना साधक-बाधक (प्रोज- कॉन्स) मुद्दे विचारात घेतले पाहिजे

₹ १ कोटी-रिटायरमेंट कॉर्पससाठी कुठे गुंतवणूक करावी? | रिटायरमेंट प्लॅनिंग |Retirement Planning

जरी निवृत्तीची रक्कम व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकते, परंतु जर तुम्ही हुशारीने रिटायरमेंट प्लॅनिंग केलं, तर तुम्ही एक सुंदर निधी जमा करू शकता. निवृत्ती ही अशी वेळ आहे जेव्हा आरामात जगण्यासाठी पुरेसा आर्थिक निधी आवश्यक असतो. तुमचा सेवानिवृत्ती निधी तुम्हाला तुमचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा आहे याची खात्री करण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
जरी निवृत्तीची रक्कम व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकते, परंतु जर तुम्ही हुशारीने योजना आखली तर तुम्ही एक सुंदर निधी जमा करू शकता

Mediclaim-आरोग्य विमा | 5 प्रमुख कारणे आरोग्य विम्याचा (मेडिक्लेमचा) विचार करण्याची

आरोग्य विमा (मेडिक्लेम / mediclaim ), जो तुम्हाला आर्थिक सहाय्य प्रदान करून, तुमचा आरोग्यसेवेचा खर्च पूर्ण करण्यात मदत करते. त्याच बरोबर तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाचा ताण कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या गुंतवणूक प्लॅनिंग मध्ये आरोग्य विमा समाविष्ट करणे आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसी मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटवर दबाव टाकण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

Short-term investment | 5 अल्प-मुदतीचे गुंतवणूक पर्याय

दीर्घकालीन गुंतवणुकीकडे नेहमीच आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे, परंतु अल्प-मुदतीच्या गुंतवणुकीवर (short-term investment) लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्याचे तुम्ही 1 ते 5 वर्षांच्या आत रोखीत रूपांतर करू शकता. मोठ्या रकमेचा आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड ) असणे शहाणपणाचे आहे आणि कोविड-19 ने हे आणखी महत्त्व अधोरेखित  केले आहे