Mutual Funds | ₹ १५ कोटी | १५ X १५ X १५ म्युच्युअल फंडाचा नियम – दरमहा स्टेप-अप SIP मध्ये पैसे गुंतवा

Mutual-Fund-SIP

गुंतवणुक वाढीसाठी वेळ देणे म्हणजे बागेत खत घालण्यासारखे आहे. गुंतवणूक दीर्घकालीन असावी. लवकर गुंतवणूक केल्यास, उत्तम परतावा मिळतो. म्युच्युअल फंडस् तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवतात व  शेअर बाजार हे मूळातच अस्थिर आणि अनिश्चित मानले जातात. दरवर्षी १५% इतका चांगला परतावा शेअर बाजारात नेहमीच साध्य होऊ शकत नाही. तथापि, दीर्घकालीन गुंतवुणकीमुळे ते शक्य आहे. नजीकच्या भविष्यात सुमारे १५% वार्षिक परतावा शक्य होऊ शकतो, परंतु लक्षात ठेवा, या प्रकरणात सातत्य आवश्यक आहे. त्याच बरोबर हा निव्वळ चक्रवाढाचा (कंपाऊंडिंगचा) परिणाम आहे. व त्यासाठी दरमहा स्टेप-अप SIP मध्ये पैसे गुंतवा

एक गुंतवणूकदार म्हणून, जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात रु. १ कोटी मिळवायचे असतील, तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा १५ x १५ x १५ नियम वापरून वर्षांसाठी दरमहा १५,००० गुंतवून ₹ १ कोटी जमवू शकता

चक्रवाढाची शक्ती :

चक्रवाढ ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे नियमितपणे गुंतवलेल्या छोट्या रकमा कालांतराने लक्षणीय रकमे पर्यंत वाढतात.  हे शक्य आहे कारण मागील चक्रवाढ कालावधीत मिळालेल्या व्याजावर पुढील चक्रवाढ कालावधीत व्याज मिळते. त्यामुळे, कंपाऊंडिंग हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा कणा आहे आणि कालांतराने तुम्हाला श्रीमंती पर्यंत नेऊ शकतो. म्युच्युअल फंडात लवकरात लवकर गुंतवणूकीस सुरुवात करून आपण  चक्रवाढीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. कंपाउंडिंग मागील हा प्राथमिक सिद्धांत आहे.

चक्रवाढीची शक्ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी “बचत मित्राचा”  हा युट्यूब व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास कमेंट सेक्शन मध्ये आपला अभिप्राय नक्की द्या !!

जर वर्षांसाठी दरमहा १५,००० रुपये  गुंतवले तर १५ वर्षांच्या शेवटी तुम्ही १,००,२७,६०१ रुपये जमा कराल. तुम्ही फक्त २७ लाख रुपये गुंतवले असताना, ७३ लाख रुपये चक्रवाढीच्या शक्ती मुळे कमावणे शक्य होते

वयाच्या ५० व्या वर्षी – ₹१५ कोटी

सध्या खूपदा आपल्या सगळ्यांनाच आव्हानात्मक व्यावसायिक जीवन आणि कामाच्या ठिकाणी वाढता ताण जाणवतो. यामुळे, मोठ्या संख्येने पगारदार व्यक्तींना थोडे आधीच निवृत्त व्हायचे असते. अशा व्यक्तींसाठी, करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे.

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, आयुष्यातील सुरुवातीची गुंतवणूक, गुंतवणूकदाराला किमान जोखमे सह असे उद्दिष्ट साध्य करण्यास सक्षम करते आणि तज्ज्ञ सांगतात की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून लवकर निवृत्त होण्याची योजना तयार करता येते. तरुण व्यक्तींना मासिक म्युच्युअल फंड एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात दीर्घ मुदतीत सुमारे १५% वार्षिक परतावा मिळू शकतो.

कमाई सुरू होताच गुंतवणुकीस सुरुवात करा – एखाद्या गुंतवणूकदाराने लहानपणापासून किंवा २५ व्या वर्षां पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर एखाद्या व्यक्तीला गुंतवणूक करण्यासाठी सुमारे ३५ वर्षे असतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला लवकर म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे असे गृहीत धरले, तर त्याच्याकडे अद्याप २५ वर्षे गुंतवणुकीसाठी असतील, जो कमी वेळ नाही.

वयाच्या ५० व्या वर्षा पर्यंत सुमारे ₹१५ कोटी इतकी रक्कम १५ X १५ X १५ नियम वापरून व स्टेप-अप SIP द्वारे कशी जमवता येईल ते आता खालील उदाहरणातून बघूया

१५ X १५ X १५ म्युच्युअल फंडाचा नियम

लहान वयातील गुंतवणूक एखाद्या गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट सहजतेने कसे साध्य करू शकते याची आठवण करून देण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की, “म्युच्युअल फंडाचे १५ X १५ X १५ नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हा नियम असा आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराने १५ वर्षांसाठी मासिक ₹१५,००० ची गुंतवणूक केली, तर एखाद्याच्या गुंतवणूककीची १५% परतावा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते आणि मॅच्युरिटीची रक्कम सुमारे ₹१ कोटी इतकी असेल

हे ही वाचा –  ₹ १ कोटी-रिटायरमेंट कॉर्पससाठी कुठे गुंतवणूक करावी? | रिटायरमेंट प्लॅनिंग

स्टेप-अप SIP ( Step-up SIP)

एक पद्धतशीर गुंतवणूक योजना, ज्याला SIP म्हणून ओळखले जाते, हे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे साधन आहे. SIP बचत खात्यातून निधी डेबिट करण्याची आणि साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक यांसारख्या पूर्वनिर्धारित अंतराने म्युच्युअल फंडात जमा करण्याची परवानगी देते.

गुंतवणूकदारांना अशी सूचना आहे की, मासिक SIP ची  रक्कम, वार्षिक स्टेप-अप SIP ( Setp-up SIP)  वापरून, (वार्षिक गुंतवुण रक्कमेत वाढ करून) उद्दिष्ट साध्य करण्याची संभाव्यता वाढते.

स्टेप-अप म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर हे एक साधन आहे जे तुम्हाला तुमच्या SIP गुंतवणुकीच्या वाढीचा अंदाज लावू देते. तुम्हाला तुमची गुंतवणूक दरवर्षी वाढवायची असल्यास, तुम्ही परतावा मोजण्यासाठी या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

  • स्टेप-अप एसआयपी कॅल्क्युलेटर हे गुंतवणूकदारांना तुमची बचत कशी वाढवते आणि दीर्घकालीन संपत्ती कशी निर्माण करते हे जाणून घेण्यासाठी फायदेशीर होऊ शकते.
  • स्टेप-अप कॅल्क्युलेटर देखील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक स्रोत आहे.
  • गुंतवणूकदार त्यांच्यासाठी कोणती गुंतवणूक ही योग्य पर्याय आहे की नाही हे त्वरित हिशोब करून बघू शकता.

हे ही वाचा : 2023 मधील गुंतवणुकीचे 7 सर्वोत्कृष्ट पर्याय

स्टेप अप एसआयपी कॅल्क्युलेटर कसे कार्य करते?

स्टेप अप कॅल्क्युलेटर हा एक कॅल्क्युलेटर आहे, जर तुम्ही तुमची SIP नियमितपणे ठराविक टक्केवारीने वाढवली तर SIP + स्टेप अप गुंतवणुकीच्या भावी मूल्याचा हिशोब करतो. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये आवश्यक डेटा एंटर करता, तेव्हा तुम्ही या स्टेप-अप म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरसह अंतिम रक्कम सहजतेने मिळवू शकता.

“साधारणपणे, वार्षिक १०% एसआयपी वाढवण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, जर कोणी व्यक्ती वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत असेल, तर अशा व्यक्तींसाठी सूचना आहे की १५% वार्षिक SIP स्टेप अप वापरावे.”

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या २५ व्या वर्षी ₹१५,००० मासिक एसआयपी सुरू केली, तर म्युच्युअल फंडाच्या १५ X १५ X १५ नियमानुसार, पुढील २५ वर्षांत गुंतवणुकीवर १५% वार्षिक परतावा मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. SIP कॅल्क्युलेटर नुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने मासिक SIP मध्ये १५% वार्षिक स्टेप अप वापरला तर तो येणाऱ्या २५ वर्षात म्हणजे वयाच्या ५० व्या वर्षाच्या होईपर्यंत सुमारे ₹१५ कोटी इतकी वाढू शकेल.

अगदीच सरासरी वाढीचा दर १२% जरी घेतला, तरी २५ वर्षात तुमची रक्कम ₹११ कोटी होऊ शकते हे खालील तक्त्यातून दिसून येते

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर (फोटो: सौजन्य  “स्क्रिपबॉक्स” स्टेप अप एसआयपी कॅल्क्युलेटर https://scripbox.com/plan/step-up-sip-calculator/)

गुंतवणुक करताना सर्वात योग्य आणि कार्यक्षम म्युच्युअल फंड निवडण्याची खात्री करा आणि केवळ त्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करा जिथे खर्चाचे प्रमाण फार जास्त नाही जेणेकरून शेवटी तुम्हाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळू शकेल.

कंपाउंडिंगचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही गुंतवणुकीस लवकर सुरुवात करण्याचा विचार केला पाहिजे.

एवढं मात्र लक्षात असूद्या की पैशानेच पैसा वाढतो ! 

तुमच्या गुंतवणुकीसाठी शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *