“UPI (यू पी आय ) पेमेंट” करण्यासाठी “डिजिटल रुपयाचा (ई-रुपी / eRupee) ” वापर कसा करायचा ?

डिजिटल रुपी (eRupee / ई-रुपी ) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI’s) सुरु केलेली नवीन सेवा आहे, जी वापरकर्त्यांना UPI क्विक-रिस्पॉन्स कोड (QR / क्यू आर कोड) स्कॅन करून कोणत्याही व्यापाऱ्याकडून सामान आणि सेवा खरेदी करण्याची परवानगी देते. ही सेवा सध्या १३ (तेरा) बँकांमध्ये प्राप्त आहे, जे RBI पायलट प्रकल्पाचा हिस्सा आहेत. ही सेवा २६ शहरांमधील आमंत्रित ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

५ महत्त्वाच्या गोष्टी :  UPI – यूपीआय फसवणुकीपासून बचावा करता

भारतात २०१५ नंतर इंटरनेट स्वस्त झाले, त्याचबरोबर स्मार्टफोन ही आले. २०१८ च्या नोटबंदीच्या घोषणेनंतर व कोविड महामारी आल्यानंतर आर्थिक व्यवहारात डिजिटल क्रांती आली. ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online payment) मोठ्याप्रमाणात वाढ झाली व कॅशलेस व्यवहार अधिक सोपा झाला. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असते. छोटीशी चुकही मोठी महागात पडू शकते. क्षणात तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. एकीकडे, UPI – यूपीआय ने आपले जीवन खूप सोपे केले आहे, तर दुसरीकडे, अनेक फसवणुकीच्या घटनांना देखील खूपशी लोक झपाट्याने बळी पडत आहे.

बजेट २०२३ : आयकर नियमातील ५ बदल

केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी आयकर स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा केली. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प.
सध्या, ज्यांचे उत्पन्न ₹ ५ लाखांपर्यंत आहे ते जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालींमध्ये कोणताही आयकर भरत नाहीत. नवीन कर प्रणालीमध्ये सवलत मर्यादा ₹७ लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ` ७ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

५ आयकर बचत योजना, ज्या तुमचे रिटायरमेंटचे टेन्शन दूर करतील

आदर्श आयकर करदात्याने ३१ मार्चची (आर्थिक वर्षाचा शेवट दिवस) वाट पाहण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा कर-बचत गुंतवणुकीचा प्रवास सुरू करावा. तुमचे आयकर बचत नियोजन १ एप्रिलपासून सुरू झाले पाहिजे तरच त्याला आदर्शआयकर नियोजन म्हणता येईल. तुमचे वार्षिक वेतन किंवा उत्पन्न कर पात्र ठरले तर तुम्हाला त्यावर कर द्यावा लागतो. तुम्ही पगारदार असाल किंवा व्यावसाईक, तुम्हाला आयकर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पीपीएफ (PPF) की एनपीएस (NPS) ? निवृत्तीनिधी साठी कोणती गुंतवणूक फायदेशीर

निवृत्ती ही संकल्पना आपल्या सर्वांना प्रिय आहे. निवृत्तीचा अर्थ काम न करणे असा नसून आपल्या आवडीचं काम आपल्याला आवडेल तेव्हा आणि आपल्याला आवडेल त्या पद्धतीने करणे असाही असू शकतो आणि हे केवळ आर्थिक स्वातंत्र्यानेच शक्य आहे. तथापि, जर तुम्ही पुरेशी बचत केली नाही तर, महागाई आणि वाढते आयुर्मान. या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची सेवानिवृत्तीच्या अपेक्षांना तडा जाऊ शकतो आणि  तुमचे निवृत्तीचे दिवस तणावपूर्ण असू शकतात. या कारणामुळे, भारत सरकारने आपल्यासाठी सेवानिवृत्तीसाठी पीपीएफ (PPF) की एनपीएस (NPS) हे बचत पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

Fixed Deposits|शुभवार्ता !! ह्या बँका फिक्स्ड डिपॉझिट वर ८ % टक्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत

मुदत ठेवींवरील (Fixed Deposits- एफडी) व्याजदर आता 8 टक्यांच्या पुढे जाऊ लागले आहेत. जोखीममुक्त गुंतवणूकदारांसाठी, त्यांचे पैसे मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर 8 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. या बँकांबद्दल जाणून घेऊया.

Best Investment Options | 2022-23 मधील गुंतवणुकीचे 7 सर्वोत्कृष्ट पर्याय

गुंतवणुकीमुळे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निश्चित अशी दिशा तयार करता येतो. गुतंवणूक तुम्हाला भविष्यासाठी निधीचा एक संच  (corpus of funds ) तयार करण्यात मदत करू शकते. कोविड 19 महामारीमुळे,आपण पाहतो की तुमचे भविष्य सुरक्षित करणारी गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे. (Investment Options).

सुखी व निरोगी आर्थिक जीवन जगण्यासाठीची 12 सूत्रे | 12 tips for a Happy & Healthy Financial Health

आर्थिक आरोग्य (Financial Health) म्हणजे पैशाच्या योग्य निर्णयांद्वारे तुमचे जीवन अधिक आरामदायक आणि स्थिर बनवणे व आर्थिक अनिश्चिततेसाठी तयार राहणे.
तुमचे आर्थिक आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याइतकेच ते आवश्यक आहे. बेपर्वाईने पैसे हाताळणारे लोक अनेकदा त्यांची कर्जे आणि राहण्याचा खर्च मॅनेज करण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. आर्थिक आरोग्य म्हणजे पैशाच्या योग्य निर्णयांद्वारे तुमचे जीवन अधिक आरामदायक आणि स्थिर बनवणे आणि आर्थिक अनिश्चिततेसाठी तयार राहणे.

अर्थसाक्षरता का महत्त्वाची व कसे कराल वैयक्तिक वित्त व्यवस्थापन? | Why financial literacy is important & How to manage Personal Finance?

आर्थिक साक्षरता हा आर्थिक चुका टाळण्याचा आणि मजबूत व सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी नियोजन करण्याचा, एक महत्त्वाचा भाग आहे.
असं म्हणतात कि  “The key to a Good Life is not saving aimlessly, it is Smart Investments”  “चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ध्येयविरहित बचत करणे नव्हे, तर स्मार्ट गुंतवणूक आहे”.
आर्थिक साक्षरता एखाद्या व्यक्तीचे जीवनमान सुधारू शकते.