अर्थसाक्षरता का महत्त्वाची व कसे कराल वैयक्तिक वित्त व्यवस्थापन? | Why financial literacy is important & How to manage Personal Finance?

Money Growth Clock

आर्थिक साक्षरता हा आर्थिक चुका टाळण्याचा आणि मजबूत व सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी नियोजन करण्याचा, एक महत्त्वाचा भाग आहे.
असं म्हणतात कि  “The key to a Good Life is not saving aimlessly, it is Smart Investments” चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ध्येयविरहित बचत करणे नव्हे, तर स्मार्ट गुंतवणूक आहे”.
आर्थिक साक्षरता एखाद्या व्यक्तीचे जीवनमान सुधारू शकते.

भारत असा देश आहे जिथे किमान 75% लोक साक्षर आहेत.  परंतु तुम्हाला माहित आहे का कि, प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ 29% लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत. म्हणजे फक्त 29 % भारतीय प्रौढांना बचत, गुंतवणूक, कर्ज आणि बजेटिंग या मूलभूत गोष्टी समजतात.

फक्त 50% भारतीय त्यांच्या कमाईच्या पगारातील   फक्त 20%  पर्यंत  पैसे बचत करतात

Source –  Scripbox Survey –  2021

आपण खूपदा  एकतर अती खर्च करतो किंवा जास्त बचत करतो. पैसे अधिक चांगल्या प्रकारे कसे हाताळायचे हे आपल्याला माहित नाही, कारण आपल्याला शाळांमधुन हे शिकवलं जात नाही. 

उदाहरणार्थ , 

मला आठवतंय किमी  पायथागोरसचे त्रिकुट / Pythagorean triple खूप पाठ केली होती. पण रोजच्या जीवनात मी अजिबात उपयोग केला नाही.आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे गणित शिकवली जातात पण  Power of Compounding cha  रोजच्या जीवनात कसा आपल्याला फायदा होऊ शकतो हे शिकवलं जात नाही. पण पैशाच्या बाबतीत निर्णय कसा घ्यावा,  हे शिकवलं जात  नाही जे आपल्याला रॊजच्या जीवनात फार  महत्वाचे आहे.  पण पैशाच्या बाबतीत निर्णय कसा घ्यावा,  हे शिकवलं जात  नाही जे आपल्याला रॊजच्या जीवनात फार  महत्वाचे आहे.  आणि आपण  दररोज पैशाच्या बाबतीत  निर्णय घेतो. 

आज महाराष्ट्रात फक्त 18 टक्के लोक आर्थिक रित्या साक्षर आहेत, ( स्रोत – नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन 2015 )  एकूणच भारताचा आर्थिक साक्षरता दर 29% आहे. आर्थिक साक्षरतेचा अभाव ही जागतिक समस्या आहे.

आपल्यापैकी बहुतेक जण वैयक्तिक आर्थिक बाबींसाठी, आपल्या मित्र आणि कुटुंबाकडे वळतात. पैसे सर्वच कमावतात पण आपल्या पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक, पैश्याचा योग्य  विभागणी व, बचत सर्वानाच जमेल असं नाही. आपण पाहतो कि, अगदी जास्त शिकलेली लोक सुद्धा योग्य money managemnet जमत नसल्याने आर्थिक दृष्ट्या  कोलमडतात.  

आपण काय करायला हवे हे कळत नाही.  

म्हणून अर्थसाक्षरता महत्वाची.

आदिमानवाच्या काळापासूनच माणसाला भविष्याची तजवीज करायची सवय लागली आहे. फक्त बदलत्या काळानुसार त्याच्या बचतीच्या, खर्च करण्याच्या पद्धती आणि सवयी मध्ये बदल होत गेले. अनेकदा खूप जण तक्रार करतात की माझा पगार की उत्पन्न हे पुरेसे नाही माझा खर्च जास्त होतो. यामधील बरेचजण कर्जांचे हफ्ते, लाईफस्टाईल, प्रवास खाण्याच्यासवयी त्यात होणारा खर्च, क्रेडीट कार्ड्सचे बिलं या सगळ्यात तिचा तजवीज करण्यास मेटाकुटीला आलेले असतात.  महागाईमुळे पूर्वीसारखे आता पैसे पुरत नाहीत.तर काहीजण आहे त्या पगारात काटकसर करून उत्तम रित्या हे सगळे  खर्च सांभाळत असतात

असं म्हणतात कि  “ The key to a good life is not saving aimlessly, it is smart investments”  , “चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ध्येयविरहित बचत करणे नव्हे, तर स्मार्ट गुंतवणूक आहे” 

आर्थिक साक्षरता, एक महत्त्वाचा भाग

आर्थिक साक्षरता हा आर्थिक चुका टाळण्याचा आणि मजबूत व सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी नियोजन करण्याचा, एक महत्त्वाचा भाग आहे

यासाठी आपल्याला बर्‍यापैकी आर्थिक शहाणपण  अंगी जोपासणे गरजेचा आहे  जे तुम्हाला तुमचे वैयक्तिक आर्थिक निर्णय घेताना उपयोगी  पडेल

आर्थिक साक्षरता तुम्हाला चांगला CIBIL क्रेडिट स्कोअर राखण्यात मदत करते. ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणे देखील सोपे जाते. आजकल, खूपदा  नवीन नोकरी करता देखील क्रेडिट स्कोअर विचारात घेतला जातो.

त्यासाठी आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायला हव्यात. आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे म्हणजे तुमचे पैसे कसे  save and invest करायचे हे जाणून घेणे. याचा अर्थ तुमची बिले कशी भरायची, कर्ज कसे घ्यायचे आणि पैसे जबाबदारीने कसे वाचवायचे  त्याबरोबरच पैसे कसे आणि का गुंतवायचे व  रिटायरमेंट ची  तजवीज/ योजना कशी करायची हे शिकणे

काय आहे वैयक्तिक वित्त ( म्हणजेच पर्सनल फायनान्स ) व्यवस्थापन आणि त्याचं महत्त्व? What is personal finance and why is it important)

साधारणपणे चार भागात  आपल्या आयुष्याच्या कालखंडाची विभागणी केलेली असते

  1. बालपण – 
  2. किशोर ते युवा  –  साधारणता 16 ते 25 वर्षांचा वयोगट. 
  3. मध्यम वयाचा –  26 ते 50 वर्षांचा वयोगट – अर्थाने आर्थिक उत्कर्ष किंवा संघर्षाचा काळ, 
  4. निवृत्ती –  50 वर्षांवरील व्यक्तिंचा वयोगट , मात्र काही अर्थसाक्षर मंडळी निवृत्ती काळ न म्हणता मजेचा काळ असं  म्हणतात, कारण या वयात अगदी कोणताही टेन्शन न घेता  ते जगण्याचा प्रयत्न करतात.

तरीही काही लोक म्हातारपणाची तजवीज कशी काय बरं व्यवस्थितपणे करून ठेवू शकतात ? म्हणजेच त्यांनी फायनान्शिअल प्लॅनिंग व्यवस्थित केलेलं असतं व त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं असतं

कशी सुरुवात करायची पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट ला ?

तज्ज्ञ  म्हणतात की 

  1. लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करा
  2. तुमचं जमाखर्च (  Income and Expenditures) मांडायला शिका – जमा व खर्चाची वेळोवेळी नोंद करा. अगदी बारीक-सारीक जमा खर्चाची वेळोवेळी नोंद करावी. बरेचदा थोड्या-थोड्या रकमेचा खर्च आपला एखाद्या बाबीवर महिन्याकाठी किती अवास्तव आहे हे या द्वारे लक्षात येऊ शकतं. व त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे.तसं तुम्ही जमाखर्च लिहून ठेवला तर तुमचं खर्चावर नियंत्रण येऊ शकतं.  तुमचा खर्च कमी होऊ शकतो जर तुम्ही तुमची  महिन्याची बिलं वेळच्यावेळीभरत असाल तर. अवास्तव क्रेडिट कार्डचा वापर करू नका नाहीतर  क्रेडिट कार्डचा महिन्याचं बिल हाच एक भलामोठा डायनोसर म्हणून  तुमच्यापुढेउभा राहू शकतो
  3. एक फायनान्शिअल पोर्टफोलिओ तयार करा व त्यात विविधता आणा / म्हणजे divercified portfolio तयार  करा. (divercified portfolio  वर माझ्या मागील एका व्हिडिओमध्ये मी याबद्दल बोललो आहे) 
  4. तुमच्या उद्धिस्टांची ( Goals) अल्पकालीन ( Short Term)  आणि दीर्घकालीन  ( Long Term ) अशी विभागणी करा. कार किंवा फ्रिज घेणे हे झालं  Short Term Goal. रिटायरमेंट इतस तरतूद किंवा घर किंवा स्थावर मालमत्ता घेणं हे झालं Long Term Goal
  5. तुम्हाला वाटते त्या पेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा 
  6. आरोग्य आणि आणीबाणीसाठीची तरतूद करा – आजारपण आणि  आणीबाणीचे खर्च हे अकस्मात येतात. आरोग्याची योग्यती काळजी घेतानाच त्याच्या संबंधित काही तरतुदी असाव्यात. उदाहरणार्थ संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा  ( Madiclaim Policy ) असणे हि गरज आहे. त्याच बरोबर कॅन्सरसारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांच्या दृष्टीने महत्वाचं ठरणारं विशिष्ट विमा कवच सुद्धा असणे महत्वाचं आहे.आरोग्य, आजार याच बरोबर आपलंआयुष्याला सुद्धा विम्याचं कवच असावं (Life Insurance) . म्हणजेच एक मुदत विमा ( टर्म इंश्योरन्स ) हवाच. घरातील प्रौढ यांचा त्यात आणि कमावणाऱ्या व्यक्तींचा विमा हवाच.

बचत आणि गुंतवणुकीतला फरक 

बचत आणि गुंतवणूक : बचत आणि गुंतवणूक या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी एकमेकांशी अत्यंत जोडलेल्या आहेत कारण बचतीशिवाय गुंतवणूक होऊच शकत नाही. किंबहुना, 

  1. बचत  –  बचत हे गुंतवणुकीसाठीच पहिलं पाऊल आहे. दर महिन्यास तुम्ही उत्पन्नातील काही रक्कम अंदाजे 5  ते 10% टक्के रक्कम वेगळी काढू शकत असाल तरच तुम्ही त्या रकमेचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकाल. बचती शिवाय गुंतवणुकीला पर्याय नाही 
  2. गुंतवणूक  – गुंतवणूक करताना, पहिल्यांदा ती का, कधी आणि  तिचा कसा उपयोग करणार याचा विचार  करावा. गुंतवणूक नियोजन करताना आपलं वय, उत्पन्न, जीवनशैली, गुंतवणुकीचे  कारण, म्हणजे योग्य त्या वेळी गुंतवणूक कशासाठी वापरली जाणार उदाहरणार्थ , निवृत्ती, मुलांचे उच्चशिक्षण व लग्नकार्ये, घर,/ स्थावर  मालमत्ता, विदेशी यात्रा,याबाबत स्पष्टता असावी.

गुंतवणुकीसाठी पर्याय

गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

  1. सोने ( सोन्यात अनेक प्रकारे गुंतवणूक करता येते )
  2. म्युच्युअल फंड्स ,
  3. सरकारी रोखे,
  4. पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी,
  5. एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम, (हा विषय खोल आहे इक्विटी, डेब्ट वगैरे ),
  6. विविध ईटीएफ,
  7. मुदत ठेव म्हणजेच एफडी (यामधील गुंतवणुकी दरम्यान महागाई दर विचारात घ्या),
  8. स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट ),
  9. थेट शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या समभागात (डायरेक्ट इक्विटी ) गुंतवणूक आणि सध्याचा अगदी गाजणारा पण थोडासा धोकादायक असे अनेक पर्याय आहेत.

वरील विविध प्रकारे तुम्हाला, विचारपूर्वक अभ्यास करून गरज वाटल्यास गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन संतुलित  व वैविध्यपूर्ण ( balanced and diversified ) प्रकारची गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करतेवेळी आपली सध्याची गरज आणि आणीबाणीसाठीची तरतूद या बाबी सर्वप्रथम विचारात घ्याव्यात.

बचतीत व गुंतवणुकीत सातत्य हवं

एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, गुंतवणुकीत धर-सोड वृत्ती नको आणि त्यासाठीच गुंतवणुकीची रूपरेषा ठरवूनच गुंतवणूक करा.

दर तीन ते सहा महिन्यांनी आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या तू आपला फायनान्शियल प्लान परत एकदा रिव्ह्यू करा: एकदा गुंतवणूक केली म्हणजे सगळं संपलं असं नाही. गुंतवणुकीचा वरच्यावर आढावा घेत राहणे अत्यंत महत्वाचं असतं. कारण वेळोवेळी सरकारी धोरणं बदलत असतात, ओद्योगिक चढ उतार येत असतात, युद्ध महामारी याने सुद्धा जगाची व भारताची  आर्थिक परिस्थिती वर खाली होत असते. दळणवळण वाढल्याने महागाई ते आयात निर्यात आदि घटकांवर सुद्धा याचा परिणाम होत असतो.  नवनवीन तंत्रज्ञान येत असतं तसंच जुनं कालबाह्य होत असतं. या  सगळ्याचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. आणि यासाठीच वेळोवेळी गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे आहे. जरूर पडल्यास परत एकदा  फायनान्शिअल प्लॅनिंग करणं गरजेचं असतं

अर्थसाक्षर व्हा :

वाचकहो, वरील गोष्टी म्हणजे  फक्त आर्थिक साक्षरतेच लहानसे ज्ञान आहे. आर्थिक साक्षरता  हा असा एक विषय आहे ज्यामध्ये आपणा सर्वांनी खोलात जाऊन शिकायला हवं. आणि आता आर्थिक शिक्षण सुरू करण्याची वेळ आली आहे. तुमचे वय कितीही असो, स्वतःला  आर्थिक साक्षर करायला  अजूनही उशीर झालेला नाही. आर्थिक साक्षरता चा महत्त्वाचा भाग  एक आहे

थोडक्‍यात काय, तर  आर्थिक नियोजन करण्यापासून ते नॉमिनेशन; तसेच इच्छापत्र करण्यापर्यंत सर्व गोष्टी वेळेवर कटाक्षाने केल्यामुळे संपत्तीच्या वाढीबरोबरच मनःशांतीसुद्धा मिळेल. 

पाहा, विचार करा… आतापासून याची सुरवात करायला काय हरकत आहे?

तुमच्या आजच्या स्वप्नांशी तडजोड न करता तुमची बचत जास्तीत जास्त कशी करायची हेच आपण, आपल्या “बचत मित्र ” ह्या  पोर्टल व YouTube चॅनेल च्या विविध विडिओ मधून पाहणार आहोत.

चला तर मग, “बचत मित्र” ला पटकन like , Share  आणि Subscribe करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *