Gold Investment | सोन्यात गुंतवणूक करण्याआधी हे वाचाच..

2022 Gold Investment Schemes : जगातील अर्थव्यवस्था अस्थिर | गुंतवणूकदारांची नजर सोन्यावर |

सध्या गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे, भीतीचे कारण आहे अमेरिकेतील व्याजदर वाढ. त्यामुळे त्याचा परीणाम,जगभरातील शेअर बाजारावर (share market) होत आहे. तज्ञांच्या मते, महागाई आणि परताव्याची अनिश्चितता या दोन्हींविरुद्ध सोन्यातील गुंतवणूक (investment in gold) विश्वसनीय मानली जाते..

Gold Investment

जेव्हा जगातील अर्थव्यवस्था स्थिर नसतात, किंवा जगात युद्ध परिस्थिती निर्माण होतात, किंवा महामारी येतात तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ होते. आपण पाहिलं की कोविड महामारी शिगेला पोहोचली असताना देखील सोन्याच्या किमती दररोज वाढत होत्या. यावरून सोन्यातील गुंतवणूकीची विश्वासार्हता समोर येते.

US GDP 2022 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 1.6% घसरला (कॅलेंडर वर्ष), त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत 0.9% घसरण झाली. एकीकडे अमेरिकेचा जीडीपी (US GDP) सलग दोन तिमाहीत घसरला आहे व अमेरिकेत मंदी (recession) सुरू होईल की काय अशी भीती आहे. तर दुसरीकडे युरोपमध्ये तांत्रिकदृष्ट्या मंदी (recession) सुरू झाली आहे. या दोन्ही आर्थिक शक्तींना मंदीसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कारण की वाढती महागाई (inflation) आणि ती कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेली धोरणं. जगातील अनेक देशात सध्या अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे व त्याचाच परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढली आहे

जर आपण मागे वळून पाहिलं तर कॅलेंडर वर्ष 2001 मध्ये, देशांतर्गत इक्विटीमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये 18% सुधारणा झाली, तर सोन्याने 6% सकारात्मक परतावा दिला. 2008 मध्ये, जागतिक आर्थिक संकटात, समभाग 52% घसरले, तर सोने 26% सकारात्मक होते. 2011 मध्ये, सेन्सेक्स 24% खाली होता आणि सोन्याने 32% परतावा दिला. 2016 मध्ये, सोन्याने 11% परतावा दिला तर इक्विटीने किरकोळ 3% परतावा दिला. अलिकडच्या काळात, 2018 ते 2020 पर्यंत, यूएस चीन व्यापार युद्धे, साथीचा रोग आणि त्याचे आर्थिक परिणाम .. या दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये अत्यंत उच्च अस्थिरता दिसून आली.

US GDP 2022 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर 1.6% घसरला (कॅलेंडर वर्ष), त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत 0.9% घसरण झाली. एकीकडे अमेरिकेचा जीडीपी (US GDP) सलग दोन तिमाहीत घसरला आहे व अमेरिकेत मंदी (recession) सुरू होईल की काय अशी भीती आहे. तर दुसरीकडे युरोपमध्ये तांत्रिकदृष्ट्या मंदी (recession) सुरू झाली आहे. या दोन्ही आर्थिक शक्तींना मंदीसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कारण की वाढती महागाई (inflation) आणि ती कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेली धोरणं.

अस्थिर अशा उच्च जोखमीच्या मालमत्ता

मागील सहा महिन्यांमध्ये आपण बघितलं की जेव्हापासून रशिया आणि युक्रेन यात युद्ध सुरू झालं आणि अमेरिका युक्रेनची पाठराखण करत आहे. या परिस्थितीत शेअर बाजारात घसरण सुरू होती. मात्र, या कालावधीत सोन्याचे भाव (gold rate) वाढू लागले होते. आता परत जागतिक मंदीचा धोका आहे, त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेचा सर्वांवरून संघर्ष वाढला आहे याची पार्श्वभूमी आहे रशिया युक्रेन युद्ध. त्याचाच एक परिणाम म्हणजे, उच्च जोखमीच्या मालमत्तेमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गेल्या पाच वर्षांत सरासरी 77 % जास्त अस्थिरता दिसून आली आहे. ( क्रिप्टोकरन्सी सर्वात धोकादायक मालमत्ता मानली जाते)

जवळजवळ सरासरी 14 टक्‍क्‍यांपेक्षा कमी अस्थिरता सध्या सोन्याच्या दरात दिसून येत आहे. सोन्यातील गुंतवणूक सर्वात कमी जोखमीची ठरत आहे.

कशी करावी सोन्यातील( डिजिटल ) फायदेशीर गुंतवणूक?

शेअर बाजारात या वर्षी जानेवारीपासून चढ-उतार सुरू झाले आहेत. शेअर बाजार चांगला परतावा देतो जेव्हा परिस्थिती चांगली असते. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी हळूहळू आणि सातत्याने सोने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

तुम्ही या खालील तीन मार्गांनी सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यासाठी फिजिकल सोन घेण्याची किंवा दागिन्याच्या स्वरूपातील सोनं घेण्याची जरुरी नाही.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)

म्युच्युअल फंडद्वारे तुम्ही शेअर्स किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करता तसेच सोन्यातही गुंतवणूक करता येते.
सुरुवातीला गोल्ड म्युचल फंडात द्वारे तुम्ही सोन्यात छोटी गुंतवणूक करू शकता किंवा एसआयपी चा मार्ग ही उपलब्ध असतो. म्युच्युअल फंड द्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

सुवर्ण रोखे (Gold Bond)

केंद्र सरकारने सामान्य लोकांसाठी नोव्हेंबर 2015 पासून सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond Scheme) सुरू केली, ज्यातून सोन्यातील गुंतवणुकीवर सामान्य गुंतवणूकदाराला लाभ मिळत आहे. या योजनेत वैयक्तिक किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. तर हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि ट्रस्टसाठी कमाल मर्यादा 20 किलो आहे

सरकारी रोख्यांच्या स्वरूपात सुवर्ण रोखे उपलब्ध आहेत व आपली मध्यवर्ती बँक- आरबीआय हे रोखे उपलब्ध करून देते. तुम्ही तुमच्या बँकेतून, पोस्टातून ह्या रोख्यांमध्ये किंवा गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करू शकता. हे रोखे DMat स्वरूपात तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये उपलब्ध होऊ शकतात, किंवा डिजिटल स्वरूपात ही मिळू शकतात
रिझर्व बँक ह्या रोख्यांची पूर्णतः हमी देते.

आरबीआय दरवर्षी 2.5% व्याज, तुमच्या सुवर्ण रोख्यांच्या गुंतवणूकीच्या रकमेवर देत असते. ठराविक कालावधीनंतर ही योजना मर्यादित काळासाठी गुंतवणुकीसाठी खुली असते. या योजनेचा कमाल (Max) कालावधी 8 वर्षांचा आहे.

गोल्ड ईटीएफ (Gold ETF)

सोन्यात गुंतवणुकीसाठी हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. गुंतवणूकदारांना सोन्यात छोटी गुंतवणूक करण्याची संधी गोल्ड ईटीएफ म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Funds) देतात. यात सोन्याची खरेदी युनिटमध्ये केली जाते. सोने, शेअर्ससारखे खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हणतात. सोन्याच्या त्यावेळच्या बाजार मूल्याएवढी रक्कम तुम्हाला गोल्ड ईटीएफ चे युनिट विकल्यानंतर मिळतात. तुम्हाला तेवढ्या किमतीचे मिळत सोने नाही

गुंतवणुकीचे फायदे

वरील प्रमाणे सोन्यात गुंतवणूक केल्यास गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बॉण्ड्स यांसारख्या डिजिटल माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्याचे खालील अनेक फायदे :

  1. बनावट सोन्याचा धोका राहत नाही.
  2. डिजिटल स्वरूपात असल्याने चोरीला जाण्याचा धोका नसतो.
  3. त्याचबरोबर घडणावळीचा किंवा मेकिंगचा वेगळा खर्च द्यावा लागत नाही.
  4. सोने विकताना त्यात घट ही धरली जात नाही, जी फिजिकल सोन्यामध्ये किंवा दागिन्यांमध्ये विकतानाधरली जाते.
  5. यासोबतच त्याच्या देखभालीची गरज नसते.
  6. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम जमा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत नाही. तुम्ही डिजिटल फॉरमॅटमध्ये फक्त ₹100 देऊन सोन्यात गुंतवणूक सुरू करू शकता.
  7. तुम्हाला जसे जमेल तसं, तुमच्या सोयीनुसार वेळोवेळी वरील गुंतवणूक प्रकारांमध्ये वाढ करू शकता
  8. सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा तुम्हाला मिळत रहातो.

ह्या सगळ्या गुंतवणुक प्रकारातून तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळत जातो. सोन्यातील गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. त्याच बरोबर, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही गुंतवलेली रक्कम व परतावा मिळालेली वाढीव रक्कम, तुम्हाला पाहिजे तेवढी किंवा एकत्र काढून तुम्ही त्याचे फिजिकल सोने किंवा दागिनेही खरेदी शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *