Credit Score: who and how it’s decided? You need to know | क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ?तो कसा आणि कोण ठरवतं ?

What is Credit Score and how and who decides it?

CIBIL Score : ज्या लोकांनी कधी कर्ज घेतलं नाही किंवा ज्यांच्या कडे क्रेडिट कार्डही नाही, त्यांना वाटत असेल की जर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घ्यायला गेलो तर ते झटपट व सहज मिळेल. पण तुमचा समज चुकू शकतो. कारण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देताना बँक व इतर संस्था क्रेडिट इतिहास व क्रेडिट स्कोर आधी चेक करतात. तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर (Credit score) असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही किंवा किती कर्ज द्यायचे हे तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवते. म्हणजे काय तर तुमचा क्रेडिट स्कोअरचा तुमच्या कर्जवाटप निर्णय प्रक्रियेमध्ये फार मोठा वाटा असतो.

CIBIL Score Bachat Mitra

तुमचा CIBIL स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा, रेटिंगचा आणि अहवालाचा 3 अंकीय सारांश (Summary) आहे आणि हा 3 आकडी नंबर असतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित केलेला असतो. साधारणपणे 750 च्या वर चांगला स्कोअर मानला जातो.

CIBIL ही भारतातील पहिली क्रेडिट माहिती देणारी कंपनी आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर सहसा तुमचा CIBIL स्कोर म्हणून ओळखला जातो. CIBIL (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड – Credit Information Bureau (India) Limited) या संस्थेचा शॉर्टफॉर्म आहे. जी तुमचा क्रेडिट स्कोर स्कोअर तयार करते. 2000 मध्ये, CIBIL ने अमेरिकेतील ट्रान्सयुनियन संस्थेशी भागीदारी केली. या संस्थेला आता TransUnion CIBIL Ltd असे म्हणतात. CIBIL सर्वात जुनी भारतातील क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेआणि आरबीआयने दिलेल्या परवान्यावर आधारित कार्ये करते. CIBIL 2005 च्या क्रेडिट माहिती कायद्याचे पालन करते आणि व्यक्ती आणि कंपन्या या दोघांद्वारे कर्ज आणि क्रेडिट कार्डची परतफेड नोंद ठेवते. तुम्ही कधीही कर्जासाठी अर्ज केला असल्यास, CIBIL कडे तुमची माहिती असते, कारण ती बँकां व इतर संस्थांद्वारे नेहमी अपडेट केली जाते

कोण ठरवते क्रेडिट स्कोअर ?

CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट माहिती अहवाल (CIR) व्यक्तीच्या क्रेडिट रेकॉर्डच्या अहवालाच्या आधारे तयार केला जातो.क्रेडिट स्कोअर ठरवताना तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे, ते वेळेवर फेडले आहे की नाही, कोणत्या बँक किंवा इतर कर्ज देणार्‍या कंपन्यांकडून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतले आदी कर्जाशी संबंधित सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

तुम्ही तुमचा CIBIL स्कोर तपासू शकता आणि CIBIL वेबसाइटवरून अहवाल बघू शकताशकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या क्रेडिट रेकॉर्डबद्दल माहिती मिळण्यासमदत होते आणि तुम्हाला CIBIL ला कोणत्याही त्रुटीची तक्रार करण्यास सक्षम करते.

कसा ठरवला जातो क्रेडिट स्कोअर?

तुमचा CIBIL स्कोअर क्रेडिट रिपोर्टमधून घेतला जातो. तुमच्या क्रेडिट इतिहासाचा तपशील देणारा क्रेडिट रिपोर्ट तयार करण्यासोबतच, CIBIL तुम्हाला क्रेडिट स्कोर देखील देते. अगदी कंपन्यांकडे त्यांच्या क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट अहवालावर आधारित व्यावसायिक CIBIL स्कोर असतो. तुमचा CIBIL क्रेडिट स्कोअर तुमच्या क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट वर्तनावर आधारित बदलत राहू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही EMI चुकवल्यास किंवा त्वरीत पाच वैयक्तिक कर्ज चौकशी केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही तुमची ईएमआय वेळेवर भरता तुमचे कर्ज प्रीपे करता किंवा तुमच्या क्रेडिट कार्डवरील एकूण देय रक्कम वेळेवर भरता, तेव्हा तुमचा CIBIL क्रेडिट स्कोअर वाढतो.
तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या क्रेडिट योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक आहे. जसे बँका व इतर संस्था CIBIL ला तुमच्या कर्जानं संबंधित माहिती पुरवतात, तसेच ते वेळोवेळी CIBIL कडून देखील तुमच्या करताना संबंधित माहिती घेत असतात. तुमचा CIBIL क्रेडिट स्कोअर तुमचा क्रेडिट इतिहास किती चांगला आहे हे दर्शवितो, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमची विश्वासार्हता तपासण्यासाठी त्याचा वापर केला जातो

तुमची कर्जाची परतफेड आणि कर्ज घेण्याचा इतिहास, चालू असलेली कर्जे, क्रेडिट कार्डची थकबाकी इत्यादी सर्व CIBIL द्वारे संकलित केले जातात आणि आणि ते रेकॉर्ड तुमच्या CIBIL अहवालात सादर केले जातात. यात तुमचा रोजगार इतिहास आणि कर्ज चौकशी माहिती देखील असते.

TransUnion CIBIL शिवाय Equifax, Experian आणि CRIF Highmark सारख्या क्रेडिट ब्यूरो / माहिती कंपन्यां (credit information company) क्रेडिट स्कोर आणि रिपोर्ट देतात. या कंपन्यांना लोकांचा आर्थिक डेटा एकत्र करणे, त्यावर देखरेख ठेवणे, या डेटावर आधारित क्रेडिट रिपोर्ट, क्रेडिट स्कोअर गोळा करणे यासाठी परवाना दिलेला असतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित केलेला असतो. साधारणपणे 750 च्या वर चांगला स्कोअर मानला जातो.

क्रेडिट स्कोर नसेल तर ?

ज्या लोकांनी कधी कर्ज घेतलं नाही किंवा ज्यांच्या कडे क्रेडिट कार्डही नाही किंवा ते क्रेडिट कार्ड वापरत नाहीत , त्यांना वाटत असेल की जर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घ्यायला गेलो तर ते झटपट व सहज मिळेल. पण तुमचा समज चुकू शकतो. कारण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देताना बँक व इतर संस्था क्रेडिट इतिहास व क्रेडिट स्कोर आधी चेक करतात.

तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर (Credit score) असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही किंवा किती कर्ज द्यायचे हे तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवते. तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल, तर तुम्हाला कर्जाच्या बाबतीत जोखीम श्रेणीत ठेवायचे की नाही क्रेडिट कंपन्यांना ठरवता येत नाही. त्यामुळे तुमचा कोणताही क्रेडिट स्कोअर किंवा कर्जाचा इतिहास आणि रिपोर्ट नसतो.तुमच्याकडे क्रेडिट स्कोअर नसल्यास बँका व इतर संस्थातुमच्या कर्ज वाटपाचा निर्णय द्यायला व तुम्हाला कर्ज द्यायला धजावत नाहीत.

अधिक माहितीसाठी या लेखाचा शेवटच्या प्याऱ्यातील मुद्दा वाचा.

कसा सुधारायचा क्रेडिट स्कोअर ?

  1. EMI / कर्जाचा हप्ता वेळेवर भरा.
  2. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा.
  3. गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या.
  4. जितका हप्ता तुम्ही वेळेवर भरू शकता तेवढेच कर्ज घ्या.
  5. क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा.
  6. गरजेपेक्षाजास्त वैयक्तिक कर्ज ( Personal Loan) घेऊ नका.
  7. तुमच्या कर्जाची हमी देणार्‍या व्यक्तीवरही ( guarantor) लक्ष ठेवा. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तींच्या चुकीच्या व्यवहारांचा तुमच्या स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.
  8. जमल्यास तुमचे कर्ज प्रीपे करा.
  9. कर्ज फेडल्यानंतर क्रेडिट हिस्ट्री बाळगणाऱ्या संकेतस्थळावर आपले रेकॉर्ड अपडेट झाले आहे की नाही, हे तपासून पहा.

अनेकदा बँकांकडून कर्जफेडीची माहिती वेळेत दिली जात नाही.म्हणन बँकेकडून कजफेडीची माहिती क्रेडिट स्कोअरची सेवा देणाऱ्या संस्थांना दिली गेली नसेल, तर ती माहिती संबंधित क्रेडिट रेटिंग संस्थेला पुरवण्याबाबत मागणी तुम्ही बँकेकडे करू शकता.

महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, की तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके सहजपणे तुम्हाला कर्ज मिळते.एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तर त्याला भविष्यात कर्ज मिळवताना अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, एखाद्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर बँकांकडून अशा मंडळींना कर्ज देताना प्राधान्य दिले जाते

आणखीन एक मुद्दा – क्रेडिट स्कोअर चांगला नसला तरी कर्ज मिळते. क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळणार नाही, असा काही नियम नाही. अनेकांचा क्रेडिट स्कोअर कोणत्या ना कोणत्या कारणाने खराब राहू शकतो. अशा प्रकरणात बँका लिक्विड गॅरंटी जसे की इन्श्युरन्स पॉलिसी, बाँड या कागदपत्रांची हमी म्हणून मागणी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *