स्टॉक मार्केट मध्ये पैसे का गुंतवावेत ? फायदा की तोटा

मागील काही वर्षात लोकं  फिक्स डिपॉझिट, सोन, रिअल इस्टेट इत्यादींसारख्या पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमधून ( स्टॉक मार्केट ) शेअर बाजाराकडे वळत आहेत. कारण, शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा महागाईवर मात करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. स्टॉक्स किंवा शेअर्स तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मौल्यवान भाग असू शकतात. वेगवेगळ्या  कंपन्यांच्या  शेअर्स मध्ये  गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमची बचत वाढवण्यात, महागाई आणि करांपासून तुमच्या पैशांचे संरक्षण करण्यात आणि तुमच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यात मदत होऊ शकते.