“UPI (यू पी आय ) पेमेंट” करण्यासाठी “डिजिटल रुपयाचा (ई-रुपी / eRupee) ” वापर कसा करायचा ?

डिजिटल रुपी (eRupee / ई-रुपी ) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI’s) सुरु केलेली नवीन सेवा आहे, जी वापरकर्त्यांना UPI क्विक-रिस्पॉन्स कोड (QR / क्यू आर कोड) स्कॅन करून कोणत्याही व्यापाऱ्याकडून सामान आणि सेवा खरेदी करण्याची परवानगी देते. ही सेवा सध्या १३ (तेरा) बँकांमध्ये प्राप्त आहे, जे RBI पायलट प्रकल्पाचा हिस्सा आहेत. ही सेवा २६ शहरांमधील आमंत्रित ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

५ महत्त्वाच्या गोष्टी :  UPI – यूपीआय फसवणुकीपासून बचावा करता

भारतात २०१५ नंतर इंटरनेट स्वस्त झाले, त्याचबरोबर स्मार्टफोन ही आले. २०१८ च्या नोटबंदीच्या घोषणेनंतर व कोविड महामारी आल्यानंतर आर्थिक व्यवहारात डिजिटल क्रांती आली. ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online payment) मोठ्याप्रमाणात वाढ झाली व कॅशलेस व्यवहार अधिक सोपा झाला. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे असते. छोटीशी चुकही मोठी महागात पडू शकते. क्षणात तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. एकीकडे, UPI – यूपीआय ने आपले जीवन खूप सोपे केले आहे, तर दुसरीकडे, अनेक फसवणुकीच्या घटनांना देखील खूपशी लोक झपाट्याने बळी पडत आहे.