५ आयकर बचत योजना, ज्या तुमचे रिटायरमेंटचे टेन्शन दूर करतील
आदर्श आयकर करदात्याने ३१ मार्चची (आर्थिक वर्षाचा शेवट दिवस) वाट पाहण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा कर-बचत गुंतवणुकीचा प्रवास सुरू करावा. तुमचे आयकर बचत नियोजन १ एप्रिलपासून सुरू झाले पाहिजे तरच त्याला आदर्शआयकर नियोजन म्हणता येईल. तुमचे वार्षिक वेतन किंवा उत्पन्न कर पात्र ठरले तर तुम्हाला त्यावर कर द्यावा लागतो. तुम्ही पगारदार असाल किंवा व्यावसाईक, तुम्हाला आयकर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत.