भारतातील डिमॅट खाते – संपूर्ण माहीती (सोप्या शब्दांत )
आजच्या आधुनिक युगात सर्व काही डिजिटल झाले आहे मग गुंतवणूकही का मागे राहावी?जर तुम्हाला शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, बाँड्स, किंवा IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर सर्वप्रथम आवश्यक असते ते म्हणजे डिमॅट खाते (Demat Account).पूर्वीच्या काळात गुंतवणुकीचे व्यवहार पूर्णपणे कागदी स्वरूपात होत असत. कंपनीचे शेअर्स “शेअर सर्टिफिकेट” म्हणून दिले जात, आणि ते हरवले, खराब झाले किंवा चोरीला गेले तर मोठे नुकसान होत असे. पण १९९८ साली भारतात डिमॅट प्रणाली सुरू झाली आणि आता सर्व शेअर्स व गुंतवणुकीचे पेपर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवले जातात.