Mutual Funds | ₹ १५ कोटी | १५ X १५ X १५ म्युच्युअल फंडाचा नियम – दरमहा स्टेप-अप SIP मध्ये पैसे गुंतवा

गुंतवणुक वाढीसाठी वेळ देणे म्हणजे बागेत खत घालण्यासारखे आहे. गुंतवणूक दीर्घकालीन असावी. लवकर गुंतवणूक केल्यास, उत्तम परतावा मिळतो. म्युच्युअल फंडस् तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवतात व  शेअर बाजार हे मूळातच अस्थिर आणि अनिश्चित मानले जातात. दरवर्षी १५% इतका चांगला परतावा शेअर बाजारात नेहमीच साध्य होऊ शकत नाही. तथापि, दीर्घकालीन गुंतवुणकीमुळे ते शक्य आहे. नजीकच्या भविष्यात सुमारे १५% वार्षिक परतावा शक्य होऊ शकतो, परंतु लक्षात ठेवा, या प्रकरणात सातत्य आवश्यक आहे. त्याच बरोबर हा निव्वळ चक्रवाढाचा (कंपाऊंडिंगचा) परिणाम आहे. 

Fixed Deposits|शुभवार्ता !! ह्या बँका फिक्स्ड डिपॉझिट वर ८ % टक्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत

मुदत ठेवींवरील (Fixed Deposits- एफडी) व्याजदर आता 8 टक्यांच्या पुढे जाऊ लागले आहेत. जोखीममुक्त गुंतवणूकदारांसाठी, त्यांचे पैसे मुदत ठेवींमध्ये ठेवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर 8 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. या बँकांबद्दल जाणून घेऊया.

Mediclaim-आरोग्य विमा | 5 प्रमुख कारणे आरोग्य विम्याचा (मेडिक्लेमचा) विचार करण्याची

आरोग्य विमा (मेडिक्लेम / mediclaim ), जो तुम्हाला आर्थिक सहाय्य प्रदान करून, तुमचा आरोग्यसेवेचा खर्च पूर्ण करण्यात मदत करते. त्याच बरोबर तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाचा ताण कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या गुंतवणूक प्लॅनिंग मध्ये आरोग्य विमा समाविष्ट करणे आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसी मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी कव्हरेज देतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटवर दबाव टाकण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता.

Short-term investment | 5 अल्प-मुदतीचे गुंतवणूक पर्याय

दीर्घकालीन गुंतवणुकीकडे नेहमीच आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे, परंतु अल्प-मुदतीच्या गुंतवणुकीवर (short-term investment) लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे, ज्याचे तुम्ही 1 ते 5 वर्षांच्या आत रोखीत रूपांतर करू शकता. मोठ्या रकमेचा आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड ) असणे शहाणपणाचे आहे आणि कोविड-19 ने हे आणखी महत्त्व अधोरेखित  केले आहे

Car insurance | २०२२-२३ मध्ये कार साठी मोटर विमा पॉलिसी कशी निवडू?

(Car Insurance) भारतात सर्वसमावेशक कार विमा खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. हे केवळ तुम्ही कायद्याचे पालन करत असल्याची खात्री करत नाही तर कारच्या दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्चाबाबत आर्थिक मदत देखील करते. कार विमा खरेदी करणे गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांसाठी अनुकूल झाले आहे. तुम्ही विमा कंपनीच्या वेबसाइटद्वारे किंवा त्यांच्या अ‍ॅप्स द्वारे 3 मिनिटात कारचा विमा काढू शकता. मात्र, तुमच्या कारचा विमा काढताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हा लेख या सर्व मुद्यांवर आहे.

DEMAT account | डीमॅट खाते उघडताय ? लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

जर तुम्हाला शेअर (स्टॉक) मार्केटबद्दल उत्सुकता असेल आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पहिली पायरी म्हणजे डीमॅट खाते उघडणे. तुमचे अंतिम आर्थिक उद्दिष्ट काहीही असो, शेअर मार्केटमधील कोणतेही व्यवहार करण्यासाठी डीमॅट खाते (DEMAT Account) उघडणे ही महत्त्वाची आवश्यकता आहे. तुम्ही जे शेअर्स खरेदी करता त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज असते आणि डीमॅट खाती तुमच्या गुंतवणुकीला योग्य असा आश्रय देतात.

Availing home loan? Wait .. read this | गृहकर्ज घेताय? थांबा .. हे वाचा

घर ही एक मालमत्ता आहे जी आपल्याला असंख्य आर्थिक लाभ मिळविण्यात मदत करते. तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा तुमचे नवीन घर शोधण्यासाठी उत्सुक असाल तर, अनेक बँक व वित्त संस्था किफायतशीर आणि फायदेशीर असलेल्या गृहकर्जाच्या (Home Loan) अनेक संधी उपलब्ध करून देत असतात.
तुमच्याकडे रोख रकमेची कमतरता असल्यास किंवा तुमची बचत नवीन घरासाठी खर्च करू इच्छित नसल्यास गृहकर्ज हा आर्थिक सहाय्याचा एक उत्तम मार्ग आहे.

Cancer Insurance – things you must know | कॅन्सर विम्याबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे

दुर्दैवाने,कॅन्सर हा आजार उपचार करण्यासाठी सर्वात महागड्या आजारानंपैकी एक आहे आणि ज्यासाठी आपण कमीतकमी तयार असतो . तो कधीही कोणालाही होऊ शकतो.
विविध प्रकारच्या कॅन्सरच्या आजारा वरील खर्चा साठी विमा कव्हर (cancer insurance) देणाऱ्या योजना सध्या विमा कंपन्यांकडून ऑफर केल्या जात आहेत. गंभीर आजार योजनेच्या तुलनेत या योजना अधिक चांगले कव्हरेज आणि वैशिष्ट्ये प्रदान करतात.

Credit – Debit Card | क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घेताय? मग हे वाचाच

Cridt Card V/S Debit Card – डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, हे वस्तू किंवा सेवांसाठी रोख पैसे न देता किंवा चेक न लिहिता पैसे देण्यासाठी वापरले जातात. खरेदीसाठी पैसे कुठून येतात, हा या दोघांमधील फरक आहे.
जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरून पैसे खर्च करता, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे वापरत नाही, उलट तुम्ही अल्प मुदतीचे कर्ज घेत आहात. क्रेडिटची कमाल ( maximum) रक्कम निर्धारित करताना आर्थिक व क्रेडिट इतिहास, भरण्याची क्षमता, उत्पन्न आणि कर्ज हे मापदंड आहेत, जे विचारात घेतले जातात.

Stock Market | “स्टॉक मार्केट” – संकल्पना व 50 शब्दावली

तुम्ही नवोदित किंवा अनुभवी स्टॉक गुंतवणूकदार असाल, स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market ) वापरल्या जाणार्‍या मूलभूत संज्ञा / शब्दावलीचे ज्ञान आवश्यक आहे. शेअर बाजारातील तुमचा शब्दसंग्रह वाढत असताना तुम्ही केवळ एक चांगले गुंतवणूकदारच नाही तर एक यशस्वी व्यापारी देखील व्हाल.  भारतातील स्टॉक मार्केटची स्थिती स्पष्ट करण्यासाठी तज्ञ आणि इक्विटी विश्लेषक स्टॉक मार्केट शब्दावली वापरतात.